दहा हजारांची नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, नांदेड जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचा आरोप

sambhaji brigade

नांदेड : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अर्धापूर तहसील कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी (ता.१४) बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, सरसकट पिक विमा मिळाला पाहिजे, दिवसा शेतकऱ्यांच्या थ्री फेज वीज मिळाली पाहिजे, पिकविमा मिळण्यासाठीची उंबरवठा पद्धत रद्द झाली पाहिजे, वृद्ध शेतकऱ्यांच्या मानधन मिळाले पाहिजे या व इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अर्धापुर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या मागण्याला शासनाने महत्व देणे गरजेचे आहे. पण, शासन महत्व देतांना दिसत नाही असे मत संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख उमाकांत उफाडे यांनी मत व्यक्त केले. हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई पोटी शासनाने देऊ केले ती शेतकऱ्यांची थट्टा करण्यासाठी आहे. येत्या काही दिवसात हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई दिली नाही तर राजकीय नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांनी दिला.

जवळपास पंचवीस पेक्षा जास्त बैलगाड्या या मोर्चात सहभागी होत्या. यावेळी शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शेतकरी हिताच्या मागण्यांणी परिसर दणाणुन गेला होता. नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दशरथ कदम, बाला कदम, विठ्ठल भिसे, संतोष कदम, चंद्रकांत कल्याणकर, यांच्यासह शेतकरी मोर्चात उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या