कोरोनाग्रस्तांच्या आत्महत्या प्रकरणी भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

नवी दिल्ली : कोरोना काळात अनेकांनी आपला जीव गमावला.काही कोरोनाग्रस्त अनेक दिवस रुग्णालयामध्ये राहिल्याने अनेकांनी कोरोनाने जीव घेण्याआधीच आपले जीवन संपवल्याच्या अनेक घटना आपण या संकटकाळात ऐकल्या आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना भरपाई देण्याचा विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने केंद्र सरकारला दिले आहेत.

कोरोनामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून रुग्णाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र आणि भरपाईबाबत न्यायालयाने केंद्राला फटकारल्यानंतर केंद्राने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची दखल घेत असताना न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने सरकारला हा सल्ला दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राने जारी केलेल्या नियामावलीवर समाधान व्यक्त केले आहे. मात्र 3-4 मुद्द्यांवर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाने दिलेल्या सूचनांना अनुसरुन नियमावलीमध्ये दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी आपली तयारी असल्याचे दर्शवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या