Share

Mangal Prabhat Lodha | शिवरायांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंशी, भाजप मंत्र्याचे प्रतापगडावर वादग्रस्त विधान!

Mangal Prabhat Lodha | सातारा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. या दोघांच्या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. पुन्हा एकदा भाजप मंत्र्यांने वादग्रस्त विधान केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील व्यासपीठावर होते. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडांची छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा सुटकेशी तुलना करण्यात आली आहे. शिवराय आग्रामधून बाहेर पडले तशे शिंदे बाहेर पडले, असे लोढा म्हणाले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसे एकनाथ शिंदे यांनी देखील कोणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले एकनाथ शिंदे महाराष्ट्रसाठी बाहेर पडले, असे वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

मंगल प्रभात लोढा यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व 40 आमदारांच्या बंडाशी करून पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.  शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान आज परत एकदा जनतेसमोर आले.

महत्वाच्या बातम्या :

Mangal Prabhat Lodha | सातारा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now