कंपन्यांना पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावीच लागेल – आयुक्त केंद्रेकर

टीम महाराष्ट्र देशा : मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने केलेले पंचनामे पीकविमा कंपन्यांनी मान्य करून शेतकऱ्यांना विमा रक्कम द्यावीच लागेल, अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्पष्ट केले. केंद्रेकर यांनी मंगळवारी सेनगाव तालुक्‍यातील केंद्रा बुद्रुक येथे ग्रामस्थांशी त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधला.

मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून त्याचा अहवालदेखील शासनाकडे सादर केला आहे. पीकविमा कंपन्यांनी नुकसानीनंतर तातडीने पंचनामे करणे आवश्‍यक होते; मात्र त्यांनी तसे केले नाही.

त्यामुळे त्यांना प्रशासनाने केलेले पंचनामे मान्य करावेच लागतील. पीकविमा कंपन्यांच्या बाबतीत शासनाकडे अहवालदेखील सादर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीकविमा कंपन्यांनी विमा स्वीकारल्यानंतर त्यांना नुकसानभरपाईपोटी रक्कम द्यावीच लागेल. प्रस्तावांमध्ये त्रुटी असतील तर त्यांनी प्रस्ताव न स्वीकारता विमा रक्कमदेखील परत करणे आवश्‍यक होते. मात्र, आता त्यांना पीकविमा देणे बंधनकारक असल्याचे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या