CWG 2018 : भारतीय खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी, भारत ६६ पदकांसह तिसऱ्या स्थानी

टीम महाराष्ट्र देशा-  राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने उत्तम कामगिरी नोंदवली. गोल्ड कोस्टमध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने या खेळांमध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदाकांसह एकूण ६६ पदकांची कमाई केली.

Loading...

२०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेल्या ६४ पदकांच्या तुलनेत यंदाची भारतीय खेळाडूंची कामगिरी सरस ठरली. भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. तर २००२मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये ६९ पदके मिळवली होती.

नेमबाजी: भारताने नेमबाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. नेमबाजीत भारताने ७ सुवर्णपदकांसह एकूण १६ पदकं जिंकली. तेजस्विनी सावंत, जीतू राय, हीना सिद्धू, मनू भाकर, अनीश भानवाला, मेहुली घोष अशा अनुभवी नेमबाजांनी भारताला पदकं जिंकून दिली.

कुस्ती : कुस्तीत भारतीय पैलवानांनी चमकदार कामगिरी केली. कुस्तीत भारताने ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदकं जिंकली. राहुल आवारे, विनेश फोगट, साक्षी मलिक, सुमित या पैलवानांनी मैदान मारलं.

बॅडमिंटन : बॅडमिंटनमध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली. महिला एकेरीत सायना नेहवालने सुवर्णपदक जिंकले. पुरुष गटात किदाम्बी श्रीकांतने रौप्य पदक जिंकले. तसंच मिक्स् टीम इव्हेंटमध्ये भारताने सुवर्णपदकाची कमाई केली.

वेटलिफ्टींग : वेटलिफ्टींगमध्ये भारताने ९ पदकं जिंकली. यात ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकांचा समावेश आहे. मीराबाई चानू, संजीता चानू आणि पूनम यादव यांनी भारतासाठी सुवर्णपदकं जिंकली.

टेबल टेनिस : टेबल टेनिसमध्ये महिला आणि पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. याशिवाय महिला एकेरीत मनिका बत्राने सुवर्णपदक जिंकले. पुरुष दुहेरीत आणि महिला दुहेरीत भारताने रौप्य पदकाची कमाई केली.

बॉक्सिंग : बॉक्सिंगमध्ये भारताने एकूण ९ पदकं जिंकली. यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. मेरी कोमने सुवर्णपदक जिंकले.

अॅथलेटिक्स : अॅथलेटिक्समध्ये भारताने ३ पदकं जिंकली. नीरज चोपडाने भालाफेकमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून दिले. तर सीमा पुनियाने थाळीफेकमध्ये रौप्य आणि नवदीप ढिल्लोने कांस्यपदक जिंकले.

हॉकी : यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय हॉकी संघांच्या हाती निराशा आली. पुरुष आणि महिला या दोन्ही संघांना रिकाम्या हाताने परतावं लागलं.Loading…


Loading…

Loading...