‘समितीचा अहवाल आल्यानंतर विलीनीकरणाचा निर्णय’

‘समितीचा अहवाल आल्यानंतर विलीनीकरणाचा निर्णय’

Anil Parab

मुंबई: राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, प्रशासनातील अधिकारी, एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनधी तसंच आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले होते.

बैठकांचे सत्र हे चार वाजता संपलं. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री अनिब परब हे अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले. बैठकी दरम्यान कर्माचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव हा राज्य शासनातर्फे एसटी कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावापेक्षा एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीगीकरण करावे ही भुमिका एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी कायम ठेवली आहे. तर राज्य शासनाच्या प्रस्तावावर थेट प्रतिक्रिया देण्याचे आमदार पडळकर यांनी टाळले आहे. सरकारने अधिकृत भुमिका जाहीर केल्यावर प्रतिक्रिया देऊ असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आले आहेत. आता अनिल परब हे सह्याद्री अतिथी गृहाकडे निघाले आहेत. तिथे ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंतही आहेत. शिष्टमंडळासोबत अनिल परब यांनी बैठक घेतली. त्यांनंतर आता पत्रकार परिषदेत विलीनीकरणासंदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले, समितीचा अहवाल आल्यानंतरच विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या: