नववी ते बारावीची विषयरचना आणि मूल्यमापन पद्धतीसाठी समिती गठीत – आशिष शेलार

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा : शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना तसेच मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याचे म्हंटले आहे.

Loading...

शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार आणि शिक्षण आयुक्त यांच्यात विषयरचना, मूल्यमापन पद्धतीसाठी बैठक झाली. या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना तसेच मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली.

इतकेच नव्हे तर गठीत करण्यात आलेली समिती सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई आणि राज्य मंडळाची विषय योजना, मूल्यमापन पद्धती याचा अभ्यास करून १० दिवसांत अहवाल सादर करणार आहे. सदर अहवाल विचारात घेऊन नववी ते बारावीपर्यंत विषय योजना व मूल्यमापन याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी म्हंटले.Loading…


Loading…

Loading...