मिटमिटावासीयांची पोलिस आयुक्तांनी घेतली भेट

औरंगाबाद: कचरा टाकण्यावरून पडेगाव व मिटमिटामध्ये दगडफेक व जाळपोळ झाली होती. पोलिसांनी नागरिकांना घरात घुसून मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱ्यानकडून चौकशी केली जात आहे. या सर्व घटनेचा आढावा घेण्यासाठी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी मिट्मिटामधील लोकांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे एकुण घेतले.

नागरिकांनी कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या पेटून दिल्या होत्या व पोलिसांवर दगडफेक केली होती. यात पोलिस जखमी झाले होते. नंतर पोलिसांनी नागरिकांना घरात घुसून मारले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आज आयुक्तांनी गावाला भेट दिली. तसेच या प्रकरणावरून पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची बदली करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभेत केली आहे.