तूतीकोरीन हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना  

चेन्नई : तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात तीव्र आंदोलन सुरु असून, स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन करण्यात येतय. कंपनीच्या विस्ताराचं वृत्त समोर आल्यापासून आंदोलन अधिकच तीव्र होत चाललं आहे. या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याने आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.

पोलिसांच्या कारवाईत अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे तमिळी जनतेमध्ये संतापाची  लाट  आहे. दरम्यान  या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी आता  तमिळनाडू सरकारने मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची नेमणूक केली आहे.

या हिंसाचारामुळे तमिळनाडू सरकारने चौकशीसाठी आयोग नेमला आहे. प्रतिबंधात्मक आदेश असताना २२ मे रोजी हजारो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास घातलेला वेढा, पोलिसांचा गोळीबार आदी बाबींसंदर्भात आयोग चौकशी करणार आहे.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या हिंसाचाराची दखल घेत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. दोन आठवडय़ांत अहवाल देण्याचे आदेश आयोगाने त्यांना दिले आहेत.

You might also like
Comments
Loading...