पवारांना उठसूट सगळीकडे कमळचं दिसत आहे, सहकारमंत्र्यांची पवारांवर टीका

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे गेली ५० वर्षे राजकारणात आहेत, त्यांना राजकारणातील वारे लवकर कळते. आता लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने ते ईव्हीएम खराब असल्याचं बोलत आहेत. उठसूट सगळीकडे कमळचं दिसत आहे, असा घणाघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. सोलापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते.

शरद पवार यांना पराभवाची चाहूल लागली आहे, ईव्हीएमवर घड्याळाचे बटन दाबल्यावर कमळाला मत जात, ते सांगत आहेत. त्यामुळे पवार हे पराभवाची पार्शवभूमी तयार करत आहेमी, अशी टीका देशमुख यांनी केली आहे.

ठाण्यामध्ये सोलापूर महोत्सवाचे आयोजन

सोलापूर फाउंडेशनच्या वतीने १७ ते १९ मे दरम्यान ठाण्यामध्ये सोलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील खाद्य पदार्थांची चव ठाणेकरांना चाखायला मिळणार आहे. तसेच सोलापुरी संस्कृतीचे दर्शन देखील येथे होणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार असल्याचं सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.