चंद्रकांत पाटलांच्या गळ्यातील ‘त्या’ कपड्याचं आता काय झालं – राज ठाकरे

chandrakant patil and maratha kranti morcha and raj thakrey

पुुणे : कोल्हापूरचे असणारे मंत्री चंद्रकांत पाटील विरोधीपक्षात असताना गळ्यात कापड घालून मराठा आरक्षणाची मागणी करत होते, मग आता सरकार येऊन चार वर्षे झाली आजवर आरक्षण का देता आला नाही, गळयात घातलेल्या त्या कपड्याच काय झालं, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.गुरुपौर्णिमेनिमित्त आज पुण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच आयोजन करण्यात आल आहे, यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे.

काकासाहेब शिंदे या मुलाने नदीत उडू मारून जीव दिला, तो हाकनाक गेला, मी मराठा समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चाच भरभरून कौतुक केलं होत. मी आजही आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं ना की जातीय हेच सांगत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.जातीय आरक्षणाच पाप हे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांच असल्याची टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली. आधीच सरकार असो की आत्ताच हे सर्व लोक मूळ परिस्थिती सांगायला तयार नाहीत, आरक्षण हे शिक्षण आणि सरकारी नौकरीसाठी हवं असत. पुणे शहरात अनेक खासगी शैक्षणिक संस्था आहेत, किती तरी परप्रांतीय मुलं येथे शिक्षण घेतात, मग आमच्या मुलांनी कोठे शिकायचं, असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

आज लहान लहान मूल जातींवर बोलत आहेत, त्यांना कळतही नाही की आपण काय बोलतो ते, आजवर महाराष्ट्राने देशाच प्रबोधन केले आणि आता आपल्यालाच प्रबोधनाची गरज आली आहे. प्रत्येक जातीचा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसोबत हिंदवी स्वराजासाठी लढत होता. आज ह्याच जाती एकमेकांमध्ये लढत आहेत. त्यामुळे बाहेरचे लोक आपली मजा बघत असल्याच, म्हणत राज ठाकरे यांनी मनातील खंत यावेळी व्यक्त केली. आताचे आणि आधीचे सर्व मुख्यमंत्री हे बसवलेले आहेत, स्वतः काही करूच शकत नसल्याची टीकाही त्यानी केली.

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा

मराठा आरक्षण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा