‘साहेब’ गेले… माझेच नव्हे…. लक्षावधींचे छत्र हरपले…”अनाथांच्या नाथा-तुज नमो”

gopinath munde

संदीप खर्डेकर : बोला संदीप जी…काय होते…फोन होता तुमचा…डोन्ट वरी..आपले चांगले दिवस आले…यु आर इन माय हार्ट..मुके झाले ते आश्वासक शब्द…तो जिव्हाळा….माझे सर्वस्वच गेले…साहेब गेले नाहीत-साहेब कुठे ही जात नसतात-ते आहेत..इथेच..आणी खचून कसे चालेल..? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतशांत राहून, विचार पूर्वक कृती करणारे तुम्ही-तुमचेच अंश आम्ही…आज आठवणींचे मोहोळ दाटून येतय…काय काय आठवू…???

२००२ -२००३ ची बांदा ते चांदा ही संघर्ष यात्रा ? ५० दिवस २४ तास तुमच्या सोबत घालवला तो काळ ? तुमचे अफाट कष्ट..? सकाळी ७ ते रात्री १/२ वाजेपर्यंत ची अविश्रांत मेहनत ? गावागावात तुम्ही नावाने हाक मारून पाठीवर थाप दिलेली लक्षावधी माणसे ? तुमच्यावर प्रेम करणारी ? तुमच्या मांडीवर, हातात, कडेवर आई-बापांनी ठेवलेली लहान तान्हुळी बाळे, त्यांचे काढून घेतलेले फोटो? मी लोकांना रागावल्यावर ‘संदीप, लोक माझ्यावर प्रेम करतात, त्यांना येऊ देत जवळ, अरे माझे फोटो ते देवघरात लावतात, ही माणसेच माझी ताकद आहे.’ असे सांगणारे तुम्ही…?

मी, श्रीरंग केळकर आणी रवी अनासपुरे अश्या आम्हा तिघांची तुम्ही रोज आस्थेने करणारी विचारपूस आठवू ? का आम्ही जेवलो की नाही याची ही चौकशी करणारे तुमचे रूप आठवू ? रोज रात्री प्रज्ञा वहिनींना आठवणीने फोन लावून दे सांगणारे तुम्ही, त्या प्रचंड गडबडीत ही कुटुंबातील प्रत्येकाशी बोलणारे तुमचे हळवे रूप आठवू ? प्रत्येक सभेतल्या भाषणा पूर्वी त्यात्या गावातली परिस्थिती माहित करून घेणारे आणी शरद भाऊ कुलकर्णी, डॉ राजेंद्रा फडके, पासून माझ्यापर्यंत “काय बोलू या सभेत, सांगा” असे म्हणून आमच्या कडून टिप्स घेणारे आणी प्रत्यक्षात भलतेच मुद्दे घेऊन भाषण करत लोकांशी संवाद साधणारे आणी सभा जिंकणारे तुमचे लोभस रूप आठवू…?

सभा संपल्यावर मिसकील हसत “कसे झाले भाषण” असे विचारणारे आणी आमच्या कौतुकाने सुखावणारे तुम्ही किती निर्मळ होतात ओ…सभा संपल्यावर लोकांच्या गराड्यात असताना ‘साहेब चला ना उशीर होतोय पुढच्या कार्यक्रमाला’ असे मी म्हणाल्यावर ‘लोकांचे प्रेम बघ,ते मोठ्या आशेने आले आहेत, मला भेटू दे सगळ्यांना, दुसऱ्या ठिकाणच्या लोकांचे रागावून फोन येत, त्यांची समजूत काढून कसे बसे साहेबांना घेऊन पुढील ठिकाणी २/३ तास उशिराने पोहचत असू आम्ही…आणि तेथे साहेबांच्या राजबिंडया रूपाने, रांगड्या भाषण शैलीने, बेफिकीर वृत्तीने, दिलेला फेटा स्वतः बांधण्याच्या कृतीने, मंचावरील प्रत्येकाचे नाव घेऊन त्याच्याशी असलेल्या जवळीकेच्या उल्लेखाने, गळ्यातील हार काढण्याची स्टाईल,मोबाईल कानापासून लांब ठेऊन बोलणे आणी बोलणे झाल्या वर तो मोबाईल भिरकावणे, ते नाकाला बोटाने स्पर्श करणे, तो भांग पाडणे…..लोकांचा राग कुठल्या कुठे पळालेला असे, आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जादू आम्ही अनुभवत असू…

संघर्ष यात्रेनंतर तुमचे आणी माझे कौटुंबिक स्नेहबंध जुळले, माझ्या घरच्या वास्तुशांति पासून, छोट्या छोट्या कार्यक्रमा पर्यंत, तुम्ही माझा शब्द कधीच मोडला नाही, प्रतीक ला पायलेट करू नकोस त्याला सिव्हिल इंजिनीयर कर, इनफ्रा स्ट्रक्चर ला मोठा स्कोप आहे, असे सांगून सौ.मंजु ला ही तिचा निर्णय बदलायला लावणारे तुम्ही, माझे वडील अड्मिट असताना त्यांना भेटायला येणारे तुम्ही, आई बाबा दोघांच्या ही निधनानंतर घरी येऊन सांत्वन करणारे आणी ‘मी आहे तुझ्या मागे’ असे सांगून मिठीत घेणारे तुम्ही, मला वडिलांच्या जागीच होतात ……..

प्रीतम ताई च्या लग्नाची व्यवस्था माला सोपावलीत आणी मग एस एस पी एम एस च्या मैदानात पाहणीला आलात तेव्हा ‘अभिनंदन…यु आर अ व्हेरी गुड ऑर्गनाइज़र एण्ड ॲकटीव्हिस्ट असे कौतुक करतानाच लग्न झाल्यावर होटल वेस्टीन मधे कुटुंबातल्या सदस्या प्रमाणे माला शर्ट-पेंट पीस आणी सौ.मंजूला साडी देऊन अशीर्वाद देणारे तुम्ही माझे सर्वस्व आहात…साहेब, दिल्लीत पदार्पण केल्यावर तुम्ही माझ्याशी हिंदी व इंग्रजीत बोलायचात, सराव व्हावा म्हणून, आणि माझे दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे याचे तुम्हास केवढे कौतुक होते….तुझ्यातील गुणांना मी न्याय देऊ शकलेलो नाही,पण योग्य वेळी न्याय मिळेल….असे तुम्ही म्हणायचे आणि मी ‘साहेब मला तुमचे प्रेम मिळाले, यात सर्व काही मिळाले,’असे म्हणायचो…

एका वर्षी कलमाडींच्या पुणे फेस्टिव्हल ला आलात आणी अचानक मला घरी जेवायला येतो म्हणालात, अर्ध्या तासात येऊन पोचलात, बाहेरून मागवलेले सगळे बाजूला सारून मंजूला भाकरी, पिठल, चटनी करायला लावलीत आणी मनसोक्त जेवलात…काय काय आठवू साहेब …तुमचे माझ नाते फक्त आपल्यातच होते, मी तुमच्या जवळचा (जसे शेकडो तसा मी ) पण नाही साहेब काहीतरी वेगळेच रुणानुबंध आहेत आपले, गेली १२ वर्ष साधारण पणे महिन्यातून १० ते १५ वेळा आपण बोलत असू, तुम्ही मला मनातले सांगायचात, अनेक विषय डिसकस करायचात, मध्यंतरी तुम्ही पक्षाच्या पदांचा राजीनामा दिलात,तेव्हा मुंबईतील एका छोट्या बैठकीत ‘मी संदीप चा सल्ला घेत असतो’,आय डिसकस इश्यूस विथ हिम’ तो मला खरे आणी परखड मत देतो, असे तुम्ही म्हणालात तेव्हा उर अभिमानाने भरून आला.

मी तुमच्याशी खूप भांडायचो अबोला धारायचो, मग तुम्ही रवि सह काही लोकांना माझ्याशी बोलायला सांगायचे, रवि हा माला फार त्रास देतो म्हणायचे, मध्यंतरी गोविंदराव घोळवे मला बोलले, का रागवलायेस साहेबावर तेव्हा जाणवले की येश….तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता, भावनिक नाते आहे तुमचे माझे, कदाचित पूर्वजन्मीचे ?? मी त्याचवेळी तुम्हाला फोन केला…साहेब आपल्यातले तुम्ही लोकांना का सांगता म्हणून रागवलो..तर म्हणालात ‘अरे बेटा यु आर इन माय हार्ट, आपले चांगले दिवस आले,आणी तू माझा फोन घेत नाहीस, म्हणून बोललो, आणी गोविन्द माझा आहे, आणी मग लांबलचक खुलासा केलात प्रत्येक विषयाचा…… असेच १८ मे तारखेला सकाळीच फोन केलात, ८ वाजता नायर च्या मोबाईल वरून, आणी भरभरून बोललात, अनेक गोष्टींचा खुलासा केलात/तुम्हाला माहित होते मी का रागवलो आहे ते…

केंद्रीय मंत्री झालात तेव्हा २८ तारखेला पुन्हा फोन केलात ‘आता मी मंत्री म्हणून जेवायला येईन, दोन्ही जावई, येशु, प्रज्ञा सगळे येऊ, मंजूला पुरणपोळी करायला सांग म्हणालात….साहेब कधी येताय पुरणपोळी खायला….???साहेब….तुम्ही कधी ही कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर आला नाहीत…कारण आधीचा कार्यक्रम संपल्यावर प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा, कार्यकर्त्याचे मन न मोडता त्याला फोटो काढू देण्याचा तुमचा शिरस्ता, मग आताच काय घाई होती ??? का असे गेलात आम्हाला न विचारता न भेटता…??

तुम्ही आयुष्य दिलखुलास जगलात…एका राजा सारखे….पण जायची घाई केलीत….का साहेब…आमचे काय चुकले…?? मला माहित आहे तुम्ही परत येणार नाही…. पण माझे /माझ्या कुटुंबाचे झालेले व्यक्तिगत नुकसान…नाही साहेब ते कश्याने ही भरून निघणार नाही….. साहेब लौकिक अर्थाने तुम्ही आता पंचतत्वात विलीन झालात, पण साहेब तुमच्या लाडक्या पंकुताई ला बघितलेत ? आगदी तुमच्या सारखे आल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणे, तो माईक हातात घेऊन लोकांशी बोलणे,त्यांना शांत राहण्याचे आवाहन करणे, स्वतःचे दुख बाजूला सारून सर्वसामान्यांसाठी उभे ठाकणे….तुमचाच अंश तो साहेब….आणि प्रज्ञा वहिनी, प्रीतम, यशश्री, अमित, गौरव, आर्यमान, चिदु….सगळे तुमचाच तर अंश….तुम्ही म्हणायचा ना – संदीप च्या रक्ताच्या थेंबा थेंबात गोपीनाथ मुंडे आहे …होय साहेब…तुमच्या ऋणातून तर या जन्मात उतराई होवू शकत नाही…..

‘सर्व धरणे सुरक्षित’ जलसंपदा विभागाकडून करण्यात आला दावा

राज्यपालांना वाकून केलेल्या नमस्कारामुळे संजय राऊत होत आहेत ट्रोल

त्यांना वाटत मी म्हातारा झालो, युवराजनंतर भज्जीनेही ओढले निवड समितीवर ताशेरे