दिलासादायक : देशातील कोरोनामुक्तांचा आकडा वाढतोय !

corona

दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने स्थिती गंभीर बनली आहे. तर, राज्यात वेळीच कडक निर्बंध लागू केले गेल्याने त्याचे काहीसे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. देशभरातील आरोग्य व्यवस्थेवर ताण कायम असला तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज एक दिलासादायक माहिती दिली आहे.

गेले काही दिवस कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 48 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 205 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 55 हजार 338 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 197 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 लाख 4 हजार 99 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात आज दिवसभरात नव्याने ४६ हजार ७८१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ५८ हजार ८०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना मुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्याने किंचित दिलासा मिळाला आहे. सध्या ५ लाख ४६ हजार १२९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP