दिलासादायक ! कोरोनाचा रिकव्हरी रेट 39.62% : चौथ्या लॉकडाऊनपर्यंत दरात लक्षणीय वाढ

lav agrwal

नवी दिल्ली : देशात कोरोनाबधीतांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तर देशात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्याला सुरवात झाली आहे. मात्र असे असले तरी भारतात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर वाढत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

…म्हणून नागपूर शहरात २२ मे पर्यंत जुनेच आदेश लागू ठेवण्याचा तुकाराम मुंढे यांचा निर्णय

ते म्हणाले की, भारतात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला तेव्हा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर हा 7.1% होता. हाच दर दुसरे लॉकडाऊन जाहीर करताना 11.42%वर आला. तर तिसरे लॉकडाऊन जाहीर करताना हा दर इतका वाढला की तो 26.59% वर गेला. आता चौथ्या लॉकडाऊनच्या घोषणेवेळी हा दर 39.62% पोहचला आहे, म्हणजे याचाच अर्थ भारत कोरोनावर मात करत आहे. तर रुग्णांची सांख्य वाढत असली तरी रिकव्हरी रेट देखील चांगलाचं वाढला आहे.

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 1 लाख 06 हजार 886 इतकी आहे. यातून बरे होणाऱ्यांची संख्या ही 42,309 एवढी आहे. तर सध्यच्या स्थितीला 61,274 एवढ्या अॅॅक्टीव्ह केस आहेत. तसेच देशात काहीजणांचा कोरोनाने मृत्यू देखील झाला आहे. तर आतापर्यंत 3,303 जणांचा मृत्यू झाला आहे.

राजकारण करण्याऐवजी महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी मोदींकडे प्रयत्न करावेत : काँग्रेस

राज्यातील आकडेवारी

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37 हजार 136 वर गेली आहे. आतापर्यंत राज्यात आतापर्यंत 1325 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढले आहे. तर आतापर्यंत 9639 रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत सर्वाधिक आहे. 22746 रुग्ण हे एकट्या मुंबईतून आहेत.

निलेश राणे अडचणीत !… अन्यथा बाजार उठवला जाईल, ‘हिजडा’ शब्द प्रयोगावरून तृतीयपंथी चिडले