कॉमेडियन भारती सिंह, पती हर्ष यांना एनसीबीचे समन्स

bharti nad harsh

मुंबई : बॉलिवूड अमली पदार्थ प्रकरणात आता कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया  यांना एनसीबीने समन्स बजावले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी आणखी एका ड्रग्ज तस्कराला वर्सोवा-अंधेरी भागातून अटक करण्यात आली आहे .

गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत.

दरम्यान बॉलिवूड अभिनेता ‘अर्जुन रामपाल’च्या देखील राहत्या घरी देखील एनसीबीने छापा टाकला होता. तर यातच अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सला एनसीबीने समन्स बजावलं होते. तर तिला चौकशीसाठी देखील बोलवण्यात आले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार या भारतीच्या घरी काही प्रमाणात अमली पदार्थ आढळून आले आहेत. परंतु याचं प्रमाण नेमंक किती आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. एनसीबीच्या टीमनं भारती सिंह आणि तिच्या पतीला समन्स बजावलं आहे.

महत्वाच्या बातम्या