मोदी सरकार घालवा, साहित्यिक, विचारवंतांचा एल्गार

टीम महाराष्ट्र देशा- मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा साहित्यिक, विचारवंतांनी आपला आवाज बुलंद केला आहे. धर्मनिरपेक्ष भारत टिकून राहावा, भारतीय संविधान आणि त्यातील मूल्यांना धक्का लागू नये, असे ज्यांना ज्यांना वाटते, त्या सर्वांनी एकत्र येऊन, लोकशाहीविरोधातील मोदी सरकार घालवावं, असं आवाहन पत्रकाच्या माध्यमातून राज्यातील साहित्यिक, विचारवंतांनी केलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रकात ?
“संविधानावर विश्वास असणारा प्रत्येक भारतीय आज अस्वस्थ आहे. देशातील नागरिकांना व्यथित करणाऱ्या घटनाच गेल्या चार वर्षात घडत आहेत. मग ती बीफच्या मुद्द्यावरुन अखलाकची हत्या असो, उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्कार किंवा जम्मूतील कठुआ गँगरेप असो, अशा उद्विग्न घटना घडत असताना, सरकार आरोपींना पाठिशी घालत असल्याचं दिसतं. तसंच हिंदुत्ववादी संघटनांमुळे हिंदू –मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे.मात्र ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपल्यावर येते. त्यामुळे भारतीय लोकशाही टिकून राहावी असं ज्यांना वाटतं, त्यांनी एकत्र येऊन, हे लोकशाही-विरोधी सरकार गेलेच पाहिजे, अशी ठोस भूमिका घ्यायला हवी” कोणकोणत्या साहित्यिक आणि विचारवंतांनी हे पत्रक काढलं आहे ?

प्रज्ञा दया पवार, कुमार सप्तर्षी, राज कुलकर्णी, लोकेश शेवडे, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. विवेक कोरडे, सुनील वालावलकर, विजय दिवाण, राजन अन्वर, आशुतोष शिर्के, डॉ. दिलीप खताळे, किशोर बेडकीहाळ, सुरेश भुसारी, भारती शर्मा आणि डॉ. मंदार काळे या सर्वांनी मिळून हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

You might also like
Comments
Loading...