जागा वाटपाचे नंतर बघू या, आधी युतीसाठी एकत्र येऊ या – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना-भाजपची युती व्हावी ही आमची नाही; तर राज्यातील सामान्य जनतेची अपेक्षा आहे. युती हा आता सामान्य जनतेचा प्रश्न झाला आहे. युती झाली नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर येईल. ते जनतेला नको आहे. जागा वाटपाचे नंतर बघू या, आधी एकत्र येऊ या, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केले.

येथील वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन सोसायटीच्या नूतन प्रधान कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ना. सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गेली 15 वर्षे जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कारभार पाहिला आहे. त्यांच्या कारभाराला कंटाळूनच त्यांनी आम्हाला सत्तेवर बसविले आहे. ते म्हणाले, शिवसेना-भाजपची युती व्हावी ही शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचीही इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसारच आपण एकत्र येऊ या. सामान्य जनता आपल्या युतीची वाट पाहत आहे. निदान राज्याचे हित पाहून तरी युती करू या.

पुन्हा बंडखोरी की भाजपची उमेदवारी ; पहा रोहन देशमुख यांची सडेतोड मुलाखत

You might also like
Comments
Loading...