ऑफिसला घोड्यावरून येऊ का? कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना मागितली परवानगी

औरंगाबाद : ऑफिसला येण्यासाठी विविध वाहनांचा वापर केल्याचे आपण पहिले आहे. कर्मचाऱ्याच्या सोयीप्रमाणे दुचाकी, चारचाकी आदी वाहनाचा वापर सर्वसामान्य कर्मचारी करत असल्याचे आपण पाहिले आहे. परंतु नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथील रोजगार हमी योजना विभागात सहाय्यक लेखाधिकारी या पदावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने कारण देत ऑफिसला घोड्यावरून येण्यासाठीची परवानगी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

सतीश पंजाबराव देशमुख असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा कर्मचारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागात कार्यरत आहे. त्याने ३ मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, ‘मला पाठीच्या कण्याचा त्रास आहे त्यामुळे मला कार्यालयात टू व्हीलर वर येण्यासाठी त्रास होतो. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे.

घोड्यावर बसून मला विहित वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात परवानगी देण्यात यावी.’ अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे इनवर्ड केले आहे. यामध्ये रोहयो उप जिल्हाधिकारी यांना प्रतिलिपी करण्यात आले आहे. हे पत्र मराठवाड्यात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP