fbpx

यादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने

टीम महाराष्ट्र देशा : यावर्षी लोकसभा निवडणुकी बरोबरच क्रिकेट विश्वचषकाचा थरार भारतीयांना अनुभावायला मिळणार आहे.नुकतेच येत्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार १६ जूनला भारत – पाकिस्तान सामना रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

भारत – पाकिस्तान हा सामना फक्त क्रिकेटचा सामना म्हणून मर्यादित नसतो तर ही दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेची लढाई असते. आजपर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानच्या संघाला एकदा देखील भारतीय संघाचा पराभव करता आलेला नाही. विश्वचषकात भारतीय संघ हा नेहमीचं पाकिस्तान संघाच्या वरचढ ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ हा नक्कीच जय्यत तयारी ने भारतीय संघाला हारवण्यासाठी मैदानात उतरताना दिसेल. पाकिस्तान संघ जरी विश्वचषकात पराभूत होत असला तरी २०१७ च्या वर्ल्ड चॅपियन ट्रॉफी मध्ये पाकिस्तानने भारताला फायनल मध्ये पराभूत केले होते. त्यामुळे पाकिस्तान संघाला गृहीत धरून चालणार नाही.

भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता संघ मजबूत स्थितीत असल्याचे निदर्शनास येत आहे. पण इंग्लंड दौऱ्यावर भारताची झालेली नाचक्की देखील विसरून चालणार नाही. कारण यंदाचा विश्वचषक हा लहरी वातावरण असलेल्या इंग्लंड देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंडचे वातावरण हे नेहमी भारतीय संघाला मारक ठरलं आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वचषकचं भारतासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

1 Comment

Click here to post a comment