आ. नारायण पाटिल यांनी आणलेल्या निधीचे श्रेय इतरांनी घेऊ नये – सचिन बागल

कुर्डूवाडी प्रतिनीधी – हर्षल बागल : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतुन अनेक आमदारांना यावर्षी भरभरुन निधी उपलब्ध  झाला आहे. करमाळा विधानसभेचे आमदार नारायण पाटिल यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडुन 13 कोटींंचा निधी पेयजल योजनेतुन मंजुर करुन आणला आहे. काही जण 2019 ची निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन हा निधी मीच आणला आहे. अशी पत्रके सोशलमिडीयावर फिरवुन फुकटचे श्रेय घेत आहेत. आ. नारायण पाटिल यांनीच हा निधी आणल्याचे लेखी पुरावे आहेत. इतरांनी पुरावे द्यावेत असे अाव्हान महाराष्ट्र देशा टिमला बोलताना युवा सेनेचे माढा तालुका अध्यक्ष सचिन बागल यांनी केले आहे.

करमाळाचे आमदार ऩारायण पाटिल यांनी स्वता लेखी पत्र देऊन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडुन मतदार संघातील नियोजित गावांसाठी एकुण तेरा कोटी रुपये निधी मंजुर करुन आणलेला असताना राजकीय महत्वकांक्षेसाठी नवखे राजकारणी या निधीचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करित आहेत. त्यांनी निधी स्वतः हा आणल्याचा एक तरी पुरावा सादर करा असे खुल्ले आव्हानच सचिन बागल यांनी जि.प. संजय शिंदे यांचे नाव न घेता केले आहे. यावेळी नारायण पाटिल यांनी निधी आणलेले पुरावे देखील सचिन बागल यांनी सादर केले.
माढा तालुक्यातील भोसरे या गावासाठी अाजपर्यंत 30 वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी या 3 वर्षात आ. नारायण पाटिल यांनी गावाला दिला आहे याचा तपशिल सचिन बागल यांनी वाचुन दाखवला.

भोसरे गावात आमदार फंडातुन आलेेेला निधी :
1 ) मुख्यमंत्री ग्रामिण पेयजल योजनेतुन भोसरे गावासाठी 2 कोटी रुपये.
2) शिवाजी महाराज चौक क्राँक्रिट केला. – 5 लाख रु.
3) हायमास्ट भोरेवस्ती बसवला – 1.50 लाख.

४) गावठाण स्मशानभुमी कपाऊंड वाँल तयार केले. – 5 लाख.
5) स्मशानभुमी अंतर्गंत रस्ता केला – 2 लाख.
6) माळी गल्ली रस्ता काँक्रिट केला – 3 लाख रु.
7) सोमासे घर रस्ता क्राँक्रिट केला. – 3 लाख रु.
8) सिध्दु टेलर राऊतवस्ती रस्ता क्राँक्रिट केला -3 लाख रु.
9) गोडाड गल्ली रस्ता क्राँक्रिट करणे -5 लाख रु.
10) शिवाजी नगर रस्ता क्राँक्रिट करणे -2 लाख.
11) चव्हाणवस्ती रस्ता खडीकरण करणे – 3 लाख.
12) मारुती मंदिर सभामंडप बांधणे – 7 लाख रु.
13) शाहु नगर रस्ता क्राँक्रिट केला – 2 लाख रु.
14) गणेश नगर रस्ता काँक्रिट केला – 2 लाख रु.
15) मदनेवस्ती मुरमीकरण पुर्ण झाले- 3 लाख रु.
प्रत्येक गावासाठी दलितवस्ती निधी, 14 वा, 16 वा वित्त आयोग निधी,  अनेक प्रकारचे निधी हे थेट राज्य सरकारकडुन असतात पण करमाळ्याच्या आमदारकीचे दिवास्वप्न पडलेले नेते, हा देखील निधी आम्हीच आणतोय असा गवगवा करित फिरत आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजनेतुन थेट निधी प्रत्येक आमदारांना मिळाला आहे. पण अनेकांनी तो मीच आणल्याचा दावा करणं म्हणजे मोठा विनोद अाहे. तरुणांच्या नौकऱ्यांच भान असतं तर रेल्वे कारखाना मधील नौकऱ्या व चिंकहिल ट्रेनिंग सेंटर ची ही अवस्था झाली नसती. – सचिन बागल

प्लास्टिकबंदीमुळे 3 लाख नोकऱ्या धोक्यात