‘चला, आता तरी मेहबूब शेख अत्याचार प्रकरणी पीडितेला न्याय मिळेल अशी आशा आहे’, भाजपचा टोला

atul bhatkhalkar

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला ‘बी समरी’ अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. आता लवकरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांना स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नेतृत्व दिले जाणार असल्याने भाजपचे अतुल भातखळकर यांनी त्यांच्याकडे अगोदरच एक मागणी केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कमोर्तब? आतातरी मेहबूब शेखप्रकरणी पीडितेला न्याय मिळेल अशी आशा करूया. असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दरम्यान या पदासाठी राष्ट्रवादीच्या माजी आमदार व प्रवक्त्या विद्या चव्हाण तसेच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांची नावे चर्चेत होती. मात्र आता रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती मिळते आहे.

महत्वाच्या बातम्या