औषधी भवन जवळील नाल्याच्या कामासाठी आ. सतिश चव्हाण यांनी दिली २० नोव्हेंबरची डेडलाईन!

satish chavan

औरंगाबाद : शहरातील औषधी भवनजवळील पूलाचे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून १ डिसेंबरपासून हा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करावा अशा सूचना आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१४) महानगरपालिका तसेच एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांना दिल्या.

औषधी भवनजवळील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामासाठी या पूलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. शहरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात तसेच व्यापार्‍यांच्या दुकानात शिरल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. गुरूवारी आ. सतीश चव्हाण यांनी औषधी भवन येथील पूलाची पाहणी करून व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. आ.सतीश चव्हाण यांनी महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना त्वरीत बैठक लावून हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी केली होती.

त्यानुसार आज महानगरपालिका आयुक्त अास्तिककुमार पांडेय यांच्या दालनात आ.सतीश चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी, कंत्राटदार, व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी आदींची बैठक झाली. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील नाल्यांचे पाणी शहरातील नागरिक तसेच व्यापार्‍यांच्या दुकानात शिरत असून याचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापार्‍यांना बसत असल्याचे चव्हाण यांनी बैठकीत सांगितले. महानगरपालिकेने चार दिवसात औषधी भवन येथील नाला साफसफाईचे काम हाती घ्यावे, तसेच कचरा जमा होऊ नये यासाठी नाल्यात जाळ्या लावून कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावावी अशा सूचना देखील आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या.

महत्त्वाच्या बातम्या