उत्सवाच्या मुहर्तावर कोम्बीग ऑपरेशनचा श्रीगणेशा

अकोला / सचिन मुर्तडकर : अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर,अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांचे आदेशान्वये संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन ऑल आऊट राबविण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते.त्या अनुषंगाने अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेन्द्र मनवरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक जी.आर.शेळके तसेच पोलीस निरिक्षक निशांत मेश्राम,सपोनि ज्ञानोबा फड,पोलीस उपनिरिक्षक गवई,पोलीस उपनिरिक्षक शरद माळी,व अकोट शहर पोलीस कर्मचारी, या कार्यवाही मध्ये ५ अधिकारी, २९ कर्मचारी व ७ होमगार्ड यांनी कोम्बिंग ऑपरेशन ऑलआऊट अकोट शहरात राबवित प्रभावीपणे कार्यवाही करण्यात आली.

२६ऑगष्ट ला राञी १० वा.पासून २७ ऑगष्ट दुपारी २ वा.पर्यंत अकोट शहरामध्ये कोम्बिंग गस्त व नाकाबंदी दरम्यान ९८ वाहनांची तपासणीकरण्यात आली त्यामध्ये कोम्बिंग गस्त दरम्यान नेमलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातील निगरानी बदमाश व शहरातून हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार तसेच पकड वारंट मधील आरोपींच्या घरी जाऊन तपासणी करीत ९ निगरानी बदमाश तपासले असता ६ हजार मिळून आले.तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी सचिन गजानन तेलगोटे, रा.खानापूर वेस आढळून आल्याने त्याचे विरुध्द पो.स्टे.ला अप.नं.३१०/१७ कलम १४२ मपोका,१८८ भादंवि प्रमाणे कारवाई करण्यात येवून शहरामध्ये असभ्यपणाचे कृत्य करतांना आढळून येणाऱ्या ५ इसमांविरुध्द कलम ११०,११७ मुं.पो.कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.पकड वारंट मधील आरोपी विनोद नाजुकराव गडम वय ४० वर्षे,रा.वडाळी सटवाई आढळून आल्याने त्यास अटक करण्यात आली.

जिल्हा अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांनी कार्यवाही दरम्यान राञी चे वेळेत भेट देवून कोम्बिंग गस्त व नाकाबंदी तपासणी केली.शहरामध्ये गणेशोत्सव साजरा होत असल्याने संवेदनशिल भागातील गणेश मंडळाना भेटी देवून यावेळी सुचना देतांना नियमांचे पालन करण्याबाबत सुचविण्यात आले.अकोट शहर पोलीस यापुढेही गुन्हेगारांविरुध्द वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन सारखी कारवाई करण्यास तत्पर असणार आहे.