एकत्रित निवडणुका अशक्य नाही, पण आता ते शक्य नाही – आयुक्त ओ. पी. रावत

टीम महाराष्ट्र देशा :  ‘एक देश, एक निवडणूक’ही संकल्पना भाजप ने मांंडली आहे. मात्र या संकल्पनेला इतर पक्षांनी विरोध दर्शवला होताच मात्र आता मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ही हे शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारण लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या असतील तर आधी कायद्यात सुधारणा करा. एकत्रित निवडणुका अशक्य नाही पण आता ते शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी मांडली आहे. त्यामुळे ‘एक देश, एक निवडणूक’ घेण्याचा प्रयास असणाऱ्या भाजपच्या प्रयत्न मोडीस निघाला आहे.

दरम्यान, एकत्र निवडणुका घ्यायच्या असतील तर आधी कायद्यात सुधारणा करावी लागेल. तसेच ‘ईव्हीएम’ मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवावी लागेल. १९६७ पर्यंत पहिल्या चार निवडणुका एकत्रच झाल्या होत्या. मात्र आता ‘ईव्हीएम’ची उपलब्धता, कायद्यात सुधारणा आणि सुरक्षा कर्मचाऱयांची संख्या याबाबत आधी पावले उचलावी लागतील.

एक देश एक निवडणूक हा विचार उत्तम आहे. पण सध्यस्थितीत हे शक्य नाही. यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होऊ शकत नाहीत. यासाठी अद्यापि योग्य वेळ आलेली नाही, असे म्हणत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही या संकल्पनेला विरोध केला.

‘एक देश, एक निवडणूक’ ही लोकशाहीला, संविधानाला आणि संघीय रचनेला मारक -आप