सायलीने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा प्रेम कहाणीच्या रंगल्या चर्चा…!

सायलीने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा प्रेम कहाणीच्या रंगल्या चर्चा…!

saylee s

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेचे टायटल साँग ‘बडे अच्छे लगते है’ या गाण्यातील काही ओळीवर अभिनेत्री सायली संजीवने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे पोस्ट शेअर करत असून आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात तिच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटमुळे तिची प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरली.

सायली ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमधून सर्वपरिचित झाली. अशात धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड बरोबर देखील तिचे नाव जोडले जात आहे. तसेच नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. सायली संजीव ही एक मराठमोळी अभिनेत्री असून कायमच तिचा सिंपल आणि स्वीट लूक चाहत्यांना घायाळ करतो. अशात तिने आता पोस्ट केलेल्या रील व्हिडिओमध्ये तिने मेसी वेणी घातली असून, कपाळी काळ्या रंगाची टिकली लावली आहे. यामध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तिने रीलचे दोन व्हिडिओ पोस्ट केले असून, यातील एकामध्ये ‘बडे अच्छे लगते है’ या गाण्यातील काही ओळीवर तिने व्हिडिओ बनवला आहे.

तर ‘बावरा मन’ या गाण्यावर तिने दुसरा रील व्हिडिओ बनवला आहे. दोन्ही व्हिडिओमध्ये असलेली गाणी ती अगदी मनापासून आणि भावनेने गात असल्याचे दिसत आहे. तिच्या या दोन्ही व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सायली लवकरच ती ‘झिम्मा’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एबी आणि सीडी’ चित्रपटामधील तिच्या अभिनयाने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

महत्त्वाच्या बातम्या