पुण्यातील आजपासून महाविद्यालयं, विद्यापीठं सुरु; लसीचे 2 डोस बंधनकारक

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज बंद होते. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आजपासून पुण्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठं सुरु होणार आहेत. महाविद्यालयं आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

जे विद्यार्थी पुण्याबाहेरुन येणार आहेत, त्यांना आरटीपीसीआर (RTPCR) अहवाल दाखवावा लागणार आहे. तर तिकडे पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळंही आजपासून सुरु होताहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्यामुळं राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयं आणि विद्यापीठं पुन्हा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

आता सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहे, मात्र कोरोना नियमाचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेऊ असंही  यावेळी अजित पवारांनी सांगितलं होतं. सोबतच पुण्यातील हॉटेल आता 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आजपासून कॉलेज आणि विद्यापीठ आजपासून सुरु होणार आहेत. कॉलेजेस आणि विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं गरजेचं असणार आहे. तसेच”, जे विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या बाहेरून शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये येणार आहेत, त्यांना आरटीपीसीआर (RT-PCR) अहवाल दाखवावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या