मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले होते. शाळा, महाविद्यालये, मंदिरे, चित्रपटगृह, नाट्यगृह हे बंद ठेवण्यात आले होते. आता गणेशोत्सव काळानंतर देखील कोरोना स्थिती आटोक्यात असल्याने ठाकरे सरकारने अनेक गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळा येत्या ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. तर, मंदिरे आणि सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी खुली केली जाणार आहेत. दुसरीकडे, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे देखील ऑक्टोबर महिन्यात खुली केली जाणार आहेत. आता उच्च शिक्षणाची महाविद्यालये मात्र अद्यापही बंद असून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
याबाबत आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. ‘१ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करावीत असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. मात्र आपल्याकडे त्या काळात दिवाळीचा सण असल्याने त्या काळात महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. त्यानंतरच कदाचित कॉलेज सुरू करण्यात येईल. आम्ही त्या विचारात आहेत.’ असे सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केले आहे.
तसेच यावर पुढे बोलताना ते म्हणाले कि, ‘सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल. ज्याठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. याविषयी राज्य कृती दल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.’ असे देखील सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींनी ‘तेव्हा’ अदानीला कोर्टात खेचलं होतं आणि इकडे ठाकरे सरकारने दिघी पोर्ट फुकट दिला’
- ‘दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करा’
- ‘सरड्याचे बदलते रंग! कन्हैया कुमार भाजपातही जाऊ शकतो’
- राज ठाकरेंनी ‘ती’ मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही – गुलाबराव पाटील
- अमित शहांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, भाजप प्रवेशावर म्हणाले..
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<