राज्यातील कॉलेज पुन्हा होणार बंद?; उदय सामंतांनी दिली माहिती

UDAY SAMNAT

मुंबई : राज्यात कालपासून कॉलेज सुरु करण्यात आले. मात्र नुकतेच सुरु झालेले कॉलेज आता पुन्हा एकदा बंद होणार अशी चर्चा होत आहे. याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या घोषणेनंतर कालपासून पुण्यात कॉलेज सुरु झाले, मात्र आता कॉलेज पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारण उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळाला नसल्याने कॉलेज सुरु करणार नाही, असे अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज राज्यातील महाविद्यालयाबाबत निर्णय होणार असून, पुण्यातील स्वायत्त महाविद्यालय सुरु झाली आहेत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अशी माहिती दिली होती.

पुढे ते म्हणाले की, कॉलेज सुरू करण्यासंदर्भात फाईल मुख्य सचिवांकडे गेली आहे. जरा काल मिस कम्युनिकेशन झालं होतं. काल काही अटोनॉमी असलेल्या कॉलेजने आपली कॉलेजेस सुरू केली आहे. आज आम्ही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात सगळे निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे. राज्यभरातील कॉलेज सुरु करण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे देखील ते म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षापासून शाळा, कॉलेज बंद आहे. मात्र कोरोनाचा धोका काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर कॉलेज सुरु करण्यात आली. मात्र असे असताना अनेक संभ्रम झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु याबाबत अचूक माहिती आज समोर येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या