बीग बॉसच्या घरात भरणार पुन्हा कॉलेज; काही स्पर्धक बनणार शिक्षक

meera

मुंबई : मनोरंजन, भांडणं आणि बरेच टास्कने भरलेला करमणूकीचा खजाणा म्हणजे बिग बॉस घर. एकमेकांच्या हेवेदावे बाजूला टाकून आता सर्वांना एका करमणूकीसाठी सज्ज केलं जाणार आहे. शाळा आणि कॉलेजचे दिवस प्रत्येकालाच प्रिय असतात. चक्क बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा कॉलेज भरणार आहे.

बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धक शिक्षक तर काही विद्यार्थी होणार आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकांच्या कॉलेज लाईफला उजाळा मिळणार आहे. मात्र, यावेळी देखील पुन्हा एकदा मीराची मास्तरगिरी पाहायला मिळते का? आजच्या भागात समजणार आहे. या घरात ‘बीबी कॉलेज’ भरणार असून. यामध्ये काही स्पर्धक घरातील अन्य सदस्यांची शाळा घेणार आहेत.

यामुळे मीराकडे आलेलं शिक्षकपद ती कशा पद्धतीने पार पाडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यावेळी आदिश वैद्य कॉलेजमध्ये एक गुपित सांगताना दिसणार आहे. ज्यामुळे गायत्री दातार प्रचंड हसणार आहे. मात्र दादूस, मीरा आणि उत्कर्ष त्यांची शिक्षकाची भूमिका कशी पार पाडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या