Professors 22% salary hike- प्राध्यापकांच्या वेतनात २२ ते २८ टक्क्यांची वाढ

केंद्र आणि राज्यांतली महाविद्यालयं, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्राध्यापकांच्या वेतनात २२ ते २८ टक्क्यांची वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं, विद्यापीठ वेतन आयोग समितीद्वारे प्राध्यापकांच्या वेतनात वाढ करण्यास मंजुरी दिली असून अन्य भत्यांविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचं, मनुष्य़बळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं. या निर्णयामुळे आठ लाख प्राध्यापकांना वेतनवाढ मिळणार आहे. सहा हजार रुपये मूळवेतन असलेल्या सह प्राध्यापकांच्या वेतनात १० हजार ३९६ रुपये वाढ होणार आहे. तर सहयोगी प्राध्यापकांच्या वेतनात २३ हजार ६६२ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.