चालत्या बसमधून उतरने ‘ति’ला पडले महाग

एका विद्यार्थिनीचा बसच्या चाकाखाली येऊन मृत्यु 

पुणे : पीएमपी बसमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी चा बसच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकात घडली. पूनम दिलीप मणियार (वय 20, रा. हरिजवळगा, ता. निलंगा, जि. लातूर) असे अपघात झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

पुणमला नुकताच वसतिगृहात प्रवेश मिळाला होता. त्यानिमित्त ती पर्यवेक्षकांना भेटण्यासाठी निघाली होती. स. प. महाविद्यालय चौकात पीएमपी बस सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सिग्नलला थांबली होती. हिरवा दिवा सुरू झाल्यानंतर बस पुढे गेली. त्यावेळी तिने चालत्या बसमधून उतरण्याचा प्रयत्न केला. पूनम रस्त्यावर पडली आणि बसच्या चाकाखाली सापडली. त्यामुळे उपचारा आधीच तिचा मृत्यु झाला. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.