विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या लिपिकाला नागरीकांनी दिला चोप

HARRASHMENT

अमरावती  : अमरावती शहराच्या जनता कृषी महाविद्यालयाच्या लिपिकाने विद्यार्थिनी सोबत छेडखानी केली असता नागरिक व काही विद्यार्थ्यांनी या लिपिकास चांगलाच चोप दिला बाबा इंगळे अस या लिपिकाचे नाव असून हा लिपिक महाविद्यालयामधील अनेक विद्यार्थिनींची छेड काढत होता.

या लिपिकाने युवतीला छेडले असता काही युवकांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यात त्याला चोप देत नेले या वेळी त्याच्या गळ्यात चपलांचा हार ही काही त्रस्त झालेल्या युवतींनी टाकला होता. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार बाबा इंगळे याच्यासह महाविद्यालयातील आणखी दोन कर्मचारी या सर्व प्रकारात सहभागी असल्याचे पुढे आले आहे.

गाडगे नगर पोलिसांनी या लिपिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.