महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली

टीम महाराष्ट्र देशा- मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यात रविवारी सीएएच्या समर्थनात भाजपने आंदोलन केले. शहरात जमाबंदी लागू (कलम 144) असताना भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा रॅली काढली. राजगड जिल्हा मुख्यालयासमोर रॅली आली असता राडा झाला. आंदोलकांना थेट राजगडच्या महिला उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचे केस ओढले. यावरून भाजप कार्यकर्ते आणि महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, मोर्चामध्ये भाजप कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनी एका भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली आहे.मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी प्रिया वर्मा यांना धक्काबुकी केल्यानंतर त्यांनी एका नेत्याच्या भर मोर्चात आणि पोलिसांसमोर कानाखाली मारली आहे.

Loading...

राजगढ जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू होते. तरीही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी CAAच्या समर्थनार्थ रॅली काढली. त्यामुळे प्रशासन आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली. तिरंगा झेंडा हाती घेऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना महिला उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा बाजूला करत होत्या. काही आंदोलकांच्या कानसुलातही त्यांनी लगावली. या बाचाबाचीदरम्यात काही आंदोलकांनी प्रिया वर्मा यांचे केस ओढले. त्यामुळे त्या आणखीच खवळल्याचे दिसले.

दरम्यान, मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुकी झाल्यानंतर प्रिया वर्मा यांनी एका नेत्याच्या कानशिलात लगावल्याने त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक देखील केलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर #प्रियावर्माजिंदाबाद हा ट्रेंड सुरू आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण