जिल्हाधिकारी मुगळीकर सर, तुमची यंत्रणा काय करतेय?

परभणी : जिल्हाधिकारी मुगळीकर सर, सोमवारी सकाळी ७ ते ११ दरम्यान सुट दिली असल्याने शहरातील सर्व बाजारपेठामध्ये खुप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर तुमची यंत्रणा काय काम करते? असा प्रश्न सामान्य परभणीकरांना पडला आहे. जमलेल्या गर्दीमध्ये अनेक नागरिकांना जर कोराेना संसर्ग झाला तर ते खुप महागात पडणार आहे. त्यामुळे आता तरी अश्या प्रकारचे निर्णय घेतांना परभणी येथील नागरिकांच्या जिवाची तसेच आरोग्याची काळजी करुन निर्णय घ्याल अशी अपेक्षा या वेळी नागरिक करत आहेत.

कोरोंना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध लावलेले आहेत. परंतू २ ते ४ मे या दरम्यान अत्यावश्यक सेवांकरिता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सूट दिली आहे. या दरम्यान सोमवारी सकाळपासूनच परभणीतील बाजारपेठांमधून नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. या मध्ये वसमत रस्त्यावरील विद्यापीठ प्रवेशद्वार,  जिंतूर रस्त्यावरील अष्टविनायक मंदिर चौक. मध्यवस्तीमधील अष्टभुजा मंदिर चौक, गांधी पार्क, क्रांती चौक,  गुजरी बाजार, शिवाजी चौक, ग्रँड कॉर्नर, साने चौक, जनता मार्केट, कच्ची बाजार, कापड बाजार, शिवाजी रोड आदी भागात हजारो नागरिक खरेदीसाठी बाजारपेठामध्ये आलेले दिसले. तर मध्यवस्तीत नागरिकांच्या उसळलेल्या या गर्दीने रस्त्यावर वाहतुकीची मात्र कोंडी निर्माण झाली.

दरम्यान चार दिवसातील उसळल्या गर्दीने शहर पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासन देखील कोणतीही कारवाई करताना दिसले नाहीत. बाजारपेठांमधून काही व्यापारी व विक्रेते हे अधून मधून दुकाने उघडून ग्राहकांना वस्तू उपलब्ध करुन देत आहेत. त्यामुळे मध्यवस्तीतील बाजारपेठांमधून काही दुकानांसमोर नियमीतपणे गर्दी पहावयास मिळत आहे. दरम्यान लॉकडाऊन तसेच संचार बंदीच्या काळात या व्यापारी तसेच विक्रेत्यांनी विरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी असे परभणीकर व्यक्त करत आहेत. यावर पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासन कोणतीही यंत्रणा राबवू शकत नाहीत का ? असा सवाल देखील विचारला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या