कोराना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर

परभणी :  जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरुन नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वारंवार दिलेल्या सूचनेनंतरही सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी त्याचे खुलेआमपणे उल्लंघण करत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती महाराष्ट्र देशाशी बोलताना दिली.

उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे पथक सकाळपासून बाजारपेठांमधून फेरफटका मारत होते. विशेष म्हणजे या पथकाने कारवाई सुरू केल्या नंतर मुगळीकर हे स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील गुजरी बाजार, आरआर टॉवर, सुभाष रोड, गांधीपार्क, शिवाजी चौक आदी भागात पायी फेरफटका मारत जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकाने काही वाहनधारकांना समज देखील दिली. काहींना दंड ठोठावला. व्यापाऱ्यांना कठोर शब्दात मास्क वापरण्यासह सॅनिटायझरची व्यवस्था करा, सोशल डिस्टंसिंग पाळा, असे सुनावले.

मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ताफ्याने व्यापारी पेठांमध्ये खळबळ उडाली. पथक येणार या धास्तीने व्यापाऱ्यांसह रस्त्यावरील वाहनधारकांनी झटपट तोंडावर मास्क लावले. दरम्यान दुकानांमधून सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवतांना व्यापारी वर्ग दिसून आला. या वेळी मात्र सार्वजनिक गर्दीची ठिकाणे या कारवाईनंतर ओस पडायला सुरुवात झाली.

महत्वाच्या बातम्या :