सैनिकांसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे देशकार्य – भगत सिंह कोश्यारी

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्त्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा राज्यपाल महोदय आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅजेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला.

Loading...

राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले, आपण सर्वांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे हे समाजातील मोठे योगदान आहे. आज याच सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल महोदयांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सतीश जोंधळे, व्हाईस ॲडमिरल अजित कुमार, मेजर जनरल राज सिन्हा, ग्रुप कॅप्टन एस.एन.बावरे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक के.लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी बोरीकर यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनाकरिता देण्यात आलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जोंधळे यांनी सैन्य दलाप्रति आदरभावना दर्शविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्वांनी अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...