fbpx

डोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद, मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईकरांना आज अजून एक धक्का बसला आहे. मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुर्घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाने धाव घेत बचाव कार्याला सुरवात केली. या दुर्दैवी घटनेबाबत कळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून याबाबत ट्विट केले आहे.

‘डोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमी झालेले लोक लवकर बरे होतील अशी मला आशा आहे. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य करत आहे’, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

दरम्यान डोंगरीतील बाबा गल्लीत चार मजली इमारत होती. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. यात ४० ते ५० जन अडकल्याची शक्यता आहे. तर १२ जणांना आपला जीव गमवावा लागल आहे. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटानास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.