टीम महाराष्ट्र देशा: देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यामुळे राज्यात थंडी ची (Winter) हुडहुडी वाढत चालली आहे. तर देशातील दक्षिण राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाले असून त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एकीकडे हवामान कोरडे असून दुसरीकडे थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्याला चांगल्याच थंडीचा सामना करावा लागणार आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात (Temperature) चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारवा (Cold Weather) वाढला असून दुपारी उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पार हा सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने खाली गेला आहे तर कमाल तापमानातही चढतराची स्थिती दिसून आली आहे. त्यामुळे राज्यात रात्रीच्या वेळी अधिक गारवा जाणवायला लागला आहे. दरम्यान, निरभ्र आकाश असल्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचे चटके चांगलेच जाणवायला लागले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 18° खाली असल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे.
राज्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वाढली थंडी (Winter)
राज्यातून परतीच्या पावसाने माघार घेताच सर्वत्र थंडीची हुडहुडी पसरली आहे. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशापेक्षा अधिकची घट झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे या भागांमध्ये थंडावा अधिक आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसापासून औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे शहरांमध्ये राज्यातील नीचांकी 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सह राज्यांमध्ये जळगाव, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर, गोंदिया इत्यादी भागातही कमान तापमानात सरासरीच्या तुलनेने घट झाल्याचे दिसले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Gujrat Incident | गुजरात पूल दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या मिटिंगमधले ‘ते’ व्हिडीओ दाखवू का?, शिंदे गटातील नेत्याचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- Eknath Shinde | “उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा तोटा” ; शिंदे गटाकडून पुण्यात जोरदार बॅनरबाजी
- NCP | महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराने केलं ‘हे’ मोठे विधान
- Uddhav Thackeray | “मोदी आयोध्यातील श्रीरामाचे पूजन करतात अन् अनुयायी भलत्याच रामाच्या…”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा