औरंगाबाद : भाजप लोकप्रतिनिधींंना अंधारात ठेऊन उद्योगमंत्र्यांनी घेतली बैठक

Subhash-Desai,कोंबडी चोर नारायण राणे

औरंगाबाद : राज्याचे औद्योगिक धोरण सप्टेंबर मध्ये जाहिर होणार आहे. याच धोरणासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यात विभागीवार उद्योजकांच्या बैठक घेत आहेत. दोन दिवसापुर्वी पुण्यातील बैठकीनंतर शुक्रवारी  औरंगाबादेत बैठक झाली. यातून राज्याचे नव्या धोरणा विषयी उद्योजकांच्या सुचना जाणून घेण्यात आल्या. या बैठकीत शिवसेना सोडता इतर कुठल्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. तर या विषयी आम्हाला निमंत्रण दिले नाही म्हणून आम्ही बैठकीस आलो नसल्याचे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. यातून पुन्हा शिवसेना-भाजप यांच्यातील कुरघोडी समोर आली आहे.

राज्यात एकत्र येत सत्ता स्थापन केल्यापासून भाजप आणि शिवसेनेत ‘तुझं माझं जेमना अन् तुझ्या विना करमेना’ अशी स्थिती आहे. दोन्ही पक्षात अनेक मतभेद निर्माण झाले आहेत. यातूनच दोन्ही पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत सध्या दिसून येत आहेत. नाणार प्रकल्पानंतर सेना-भाजपामध्ये मोठा संषर्घ पेटला आहे. यामूळे सभा, बैठकातून सेना-भाजप एकमेकांवर टिकेचे झोड उठवत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यभरातील उद्योजकांच्या बैठकी घेत आहेत. दोन दिवसापुर्वी देसाई यांनी पुण्यात उद्योजकांची बैठक घेतली.त्यानंतर शुक्रवारी औरंगाबादेत बैठक घेतली. याबैठकीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणे गरजचे होते. मात्र केवळ शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, शिवसेनेचे संपर्क नेते विनोद घोसाळकर हे अर्वजून उपस्थित होते. ज्या पुर्व मतदार संघात ही बैठक झाली.त्यांचे आमदार अतूल सावे, मध्य विभागाचे आमदार इम्तियाज जलील हे गैरहजर दिसून आले.

Loading...

आमदार अतुल सावे यांनी व्यक्त केला संताप

उद्योगमंत्र्यांची  बैठकीला आम्हाला बोलवल नाही. आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. नंतर कळाले की डीआयसीच्या माध्यमातून बैठक झाली म्हणून. ना उद्योग खात्याने ना एमआयडीसीने डीआयसीनेही आम्हाला माहिती दिली नाही. म्हणून आमदार इम्तियाज जलीलही या बैठकीत नव्हते. विशेष म्हणजे डीएमआयसी ज्यांच्या मतदार संघात आहेत. ते विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनाही बोलविणे गरजेचे होते. मात्र शिवसेना सोडता इतर कोणत्याही पक्षातील आमदारांना बोलवून नका अशी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पॉलिसी असेल असा आरोपही आमदार अतुल सावे यांनी केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत