व्यासपीठ: सबसे बडा दुश्मन ? कोई करिबी दोस्त या पुराना साथी. . .

sadabhu khot vs raju shetti

दोस्तीत कुस्ती ………! ईमली का बुटा बेरी का पेड, ईमली खट्टी मिठे बेर. इस जंगल मे हम दो शेर, चल घर जल्दी हो गयी देर……. हा लव्ह स्टोरी कम जिगरी दोस्तीवर आधारलेला ‘सौदागर’ चित्रपट राजकुमार अन् दिलीपकुमारच्या डायलॉगबाजीमुळे चांगलाच लक्षात राहतो. राजकुमार जेव्हा चित्रपटातील हिरो विवेक मुशरनला (वासू) त्याच्याकडे कामावर घेण्यासाठी त्याची मुलाखत घेतो. त्यावेळी त्याला शेवटचा प्रश्न विचारतो. सबसे बडा दुश्मन ? त्यावर राजकुमारच्या पायथ्याशी बसलेला वासू थोडासा भावूक नजरेने राजेश्वरकडे पाहून उत्तरतो. कोई करिबी दोस्त या पुराना साथी…… विवेकच्या या उत्तराने राजकुमार म्हणजेच राजेश्वर खुश होतो आणि तात्काळ त्याच्यासमोर त्याचा जिगरी मित्र वीरू (दिलीकुमार) चेहरा येतो. राजकुमार हसतो, आणि तुम्हारा आखरी जबाव हमे बहुत पसंद आया म्हणून विवेकला नोकरीवर ठेवून घेतो.

राज्याच्या राजकारणतही सध्या तशीच परिस्थीती दिसतेय. एका जुन्या आणि जिगरी दोस्तीत कुस्ती पाहायला मिळतेय. शेतकऱ्यांच्या बांधावरची भांडणं मिटवणाऱ्या या मित्रांमध्ये सध्या सौदागर टाईप डायलॉगबाजी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भांडणारे हे दोन नेते आज ऐकमेकांची उणी-धुणी काढून भांडण आहेत. दोघांचा उद्देश शेतकरीहीत असाच आहे, तरीही भाजपसोबत झालेला हा सौदा शेतकऱ्यांचा ‘स्वाभिमान’ दुखावणारा ठरला आहे. ‘झेंडा आपला, दांडा आपला आणि दोरीही आपली’ असे सांगत सदाभाऊंनी वेगळी संघटना उभी करण्याचे संकेत पुण्यातील पत्रकार परिषदेत दिले. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर, ज्या राजू शेट्टींच्या आशिर्वादाने गावचा सदा, ‘राज्यमंत्री सदाभाऊ खोत’ झाले. मात्र, मंत्रीपदी जाताच सदाभाऊंचा स्वाभिमान जराशा अहंकारात परावर्तीत झाल्याचे दिसून येत आहे.

Loading...

आज सदाभाऊ स्वाभिमानीला रामराम ठोकण्याची भाषा करत आहेत. मात्र, स्वाभिमानीच्या कित्येक राम-रामामुळेच आज राज्यमंत्री झाल्याचे ते विसरतात. संघटेनतील शेतकऱ्यांमध्ये सदाभाऊबद्दल आज आकस निर्माण झाला आहे. आज सदाभाऊंविरुद्ध नारेबाजी आणि शेरबाजी पाहायला मिळत आहे. कधी काळी ही दोस्ती तुटायची नाय, असे म्हणणाऱ्या या नेत्यांच्या दोस्तीतील कुस्ती महाराष्ट्र पाहातोय. शेतकऱ्यांना ही कुस्ती नकोय, पण आता स्वाभिमान मोठा झालाय. त्यामुळे एक पाऊल मागे कोण येणार असा प्रश्न आहे. त्यामुळेच दोन्ही नेत्यांतील वाद टोकाला पोहोचल्याचे पाहायला मिळते.

मध्यंतरी सदाभाऊ खोत यांच्याकडून एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामध्ये सदाभाऊंनी वडिलांच्या उपचारासाठी राजू शेट्टींकडून घेतलेली 2.5 लाख रुपयांची मदत RTGS करुन राजू शेट्टींच्या खात्यावर परत केल्याची पावती दिली. तसेच, मी माझ्या वडिलांना आपल्या कर्जातून मुक्त केल्याचेही सदाभाऊ म्हणाले. मात्र, एका उदाहरण द्यावे वाटते. ‘यशवंत’ चित्रपटात नाना पाटेकरची बायको रागिनी (मधु) कलेक्टर बनते. ज्यावेळी तिची पोस्टींग मुंबईला होते, त्यावेळी तिचा कॉलेजमधील मित्र जॉन सुरक्षा अधिकारी (PSI) बनून तिच्या कार्यालयात हजर होतो. आपला कॉलेजमधील दोस्तच आपला सुरक्षा अधिकारी झाल्याचा रागिनीला आनंद होतो. त्यावेळी रागिनी जॉनला म्हणते, जॉन मुझे आज भी वो दिन याद है, जब मेरे पास कॉलेज की फीज भरने के लिए पैसे नही थे, और तुमने मेरी फीज भर दी थी. जॉन आज मै कलेक्टर हूँ, मै तुम्हारी फीज के पैसे अभी 1 मिनट मे वापस कर सकती हूँ. लेकिन, लेकिन वो समय मै कभी भी वापस नही कर सकती. इसलिए वो पैसे मै तुम्हे वापस नही करूंगी. त्यामुळे सदाभाऊ आपण 2.5 काय, आज 25 लाख रुपयेही शेट्टींना देऊ शकाल. मात्र, ती वेळ तुम्ही कधीच परत करू शकणार नाही.

सदाभाऊ तुम्ही तुमच्या वडिलांना राजू शेट्टींच्या ऋृणातून मुक्त केलं, पण मनातून कसं मुक्त करणार ? हाच खरा प्रश्न आहे. देव करो, अन् ‘सौदागर’ चित्रपटातील राजेश्वर अन् वीरसिंगप्रमाणे या रियल स्टोरीचाही हॅप्पी The End होवो आणि दोघांनी पुन्हा म्हणावं, इमली का बुटा बेरी का पेड, इमली खट्टी मिठी बेर इस जंगल मे हम दो शेर…..

लेखक
मयूर गलांडे
पत्रकार.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ