Share

Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा थंडीचा कहर, तापमानात झाली चौथ्यांदा घसरण

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये (Maharashtra) दिवसेंदिवस वातावरणात (Weather) बदल होत चालला आहे. राज्यात मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट होत आहे. त्यामुळे राज्यात गारठा (Winter) वाढत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. तर, नाताळनंतर राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा पारा घसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यामध्ये 7.8 तापमानाची नोंद झाली आहे. एकीकडे काही शेतकऱ्यांना या थंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे, तर काही शेतकऱ्यांना या थंडीचा खूप फायदा होणार आहे. कारण द्राक्षांच्या बागेला थंडीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे, तर गहू, हरभरे, कांदे इत्यादी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर आहे.

राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तापमान 7.8 अंश सेल्सिअसवर येऊन पोहोचले आहे. या थंडीमध्ये किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली येण्याची ही चौथी वेळ आहे. दरम्यान, थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक जागोजागी शेकोट्या पेठवू लागले आहेत.

दरम्यान, 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसनंतर राज्यामध्ये थंडीचा कहर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत नागरिक उबदार कपडे घालूनच बाहेर पडतं आहे.

राज्यामध्ये हळूहळू थंडीचा कहर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर देखील झाला होता. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले होते. सध्या या चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी राज्यात पुन्हा थंडीची हुडहुडी जाणवायला लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये (Maharashtra) दिवसेंदिवस वातावरणात (Weather) बदल होत चालला आहे. राज्यात मुंबई पुण्यासह अनेक …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now