दंतेवाड्यात कोंबड्यांच्या झुंजीवर १० कोटींचा सट्टा

Cock-Fight

टीम महाराष्ट्र देशा: नेहमी नक्षलवादी हल्ल्यांसाठी चर्चेतअसणारा दंतेवाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे . मात्र यावेळी नक्षली हल्ला किंवा पोलिसांची कारवाई नव्हे तर कोंबड्यांच्या झुंजीवर दिलमिली गावात सुरू असलेल्या दोन दिवसीय बाजारात लोकांनी चक्क १० कोटी रुपयांचा सट्टा लावल्यामुळे.

दसऱ्यानंतर दंतेश्वरी देवीचं आगमन या गावात होतं अशी येथील लोकांची श्रद्धा आहे त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी ही कोंबड्यांची झुंजी लढवल्या जातात.हा विषय लोकांच्या श्रद्धेशी निगडीत असल्याने यात प्रशासन कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही .काल सकाळ पासूनच या कोंबड्यांची दंगल सुरू झाली असून रविवार संध्याकाळपर्यंत ती रंगणार आहे.

COCK_FIGHT १

या जीवघेण्या खेळावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जातो. यंदा १० हजारहून अधिक कोंबड्यांचा सहभाग असून कोंबड्यांची ही दंगल बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे.या वर्षी कोंबड्याच्या झुंजींवरील सट्ट्याने सर्वच विक्रम मोडले असून १० कोटी रुपयांचा आकडा गाठल्याने कोबड्यांची दंगल चर्चेत आली आहे.सामान्य नागरिकांबरोबरच अनेक राजकीय मंडळीनी या झुंजीला हजेरी लावली आहे. लहान कोंबड्यावर १० हजार तर मोठ्या कोंबड्यांवर ४० ते ५० हजार रुपयांपर्यत सट्टा लावला जात आहे. अशी माहिती या झुंजीचे आयोजक व सरपंच आयतूराम मंडावी यांनी दिली आहे.

कशी असते कोंबड्यांची झुंज ?
या झुंजीत कोंबड्यांच्या पायाला लहान धारदार चाकू बांधलेले असतात. तसेच काहीजण कोंबड्यांची चोचही टोकदार करतात. त्यानंतर ही झुंज सुरु होते. यात कोंबडे एकमेकांना चोचा मारत व पायाला बांधलेल्या चाकूचा वार करत जखमी करतात. यात जो कोंबडा दुसऱ्या कोंबड्याला जखमी करतो त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात येते.