कोब्रापोस्टचे स्टिंग १३६- देशभरातील नामांकित न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या पेडन्यूजचा भांडाफोड

Cobrapost Sting exposed big media houses in country who say yes to paid news

टीम महाराष्ट्र देशा: देशभरातील नामंकित वृत्तसंस्थाकडून एखाद्या पक्षासाठी राबवला जाणारा अजेंडा आणि पेडन्यूजवरून गेल्या काही दिवसांत मोठे वादंग निर्माण होताना दिसत आहे, अनेकवेळा न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रे पैसे घेवून बातम्या लावत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. आता ‘कोब्रापोस्ट’ या वेबसाईटने एक स्टिंगऑपरेशन उजेडात आणले असून ज्यामध्ये देशभरातील नामांकित न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या पेडन्यूजचा भांडाफोड करण्यात आला आहे.

ऑपरेशन १३६ नावाने करण्यात आलेल्या या स्टिंगमध्ये ‘कोब्रापोस्ट’ने देशभरातील नामांकित २७ च्यावर न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यामध्ये २ संस्थाचा अपवाद वगळता इतर सर्वांनी ‘हिंदुत्व अजेंडा’ आणि ‘पेडन्यूज’ला होकार दिल्याच दिसून येत आहे. या सर्व स्टिंग ऑपरेशनचा व्हिडियो ‘कोब्रापोस्ट’ने सार्वजनिक केल्यानंतर आता देशभरातील मिडिया जगतात मोठी खळबळ माजली आहे.

‘कोब्रापोस्ट’च्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडियो ज्यामध्ये सभ्यतेचा दिखावा करणाऱ्या न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या भांडाफोड करण्यात आला आहे.Loading…
Loading...