कोब्रा पोस्टचे स्टिंग ऑपरेश : पैसे घेऊन प्रचार करणाऱ्या ‘या’ सेलिब्रेटींचा पर्दाफाश

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने देशातील पक्ष सोशल मिडीयावर पक्षाचा प्रचार करण्यासाठी सिलीब्रेटींना पोस्टसाठी पैसे दिले असल्याचा दावा कोब्रा पोस्टने केला आहे.

या वेबसाइटने यासंदर्भातील ३० पेक्षा जास्त कलाकार पैसे घेऊन प्रचार करण्यास तयार असून सुमारे ३६ कलाकारांची एक यादीच जाहीर केली आहे. बॉलिवूडमधील काही दिग्गज सेलिब्रेटींचा यामध्ये समावेश आहे.

स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत कोब्रा पोस्टने पैसे घेऊन पक्षाचा प्रचार करण्यास जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सुद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, पुनीत इस्सर, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकीतिन धीर, टिस्का चोप्रा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट्ट, सलीम जैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, सनी लिओनी, कोयना मित्रा, इवलिन शर्मा, पूनम पांडे हे बॉलिवूड सेलिब्रिटी तयार झाले आहेत.

त्यानंतर अभिनेत्री सनी लिओन आणि अभिनेता सोनू सूदने ‘कोब्रा पोस्ट’च्या दाव्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सनी लिओनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर केलेल्या ट्विटमध्ये मी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार करत नाही आणि जर कधी मी प्रचार करणार असेलच तर त्याची मी जाहीर वाच्यता करेन, असे म्हटले आहे.

1 Comment

Click here to post a comment