राज्यात पुन्हा युतीची सत्ता? आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे चर्चेला सुरूवात

cm

औरंगाबाद : राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होईल, या चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. मात्र, या वेळी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधी सूचक वक्तव्य केले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमीपूजन समारंभात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा उल्लेख करतांना त्यांनी रावसाहेब दानवे यांना उद्देशून आमचे माजी आणि आजी सहकारी असे म्हणत, या चर्चेला सुरूवात करुन दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या नंतर भाजप आणि शिवसेना युती तुटल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, या सरकारच्या भविष्याबाबत कायमच शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुढील तिन दिवसातच नवीन बातमी देण्याचे संकेत दिले होते. मी खुप काळ माजी मंत्री राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावरुन राज्यात ‘ऑपरेशन कमळ’ सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आजच्या वक्तव्यामुळे ही चर्चा पुन्हा युतीकडे वळाली आहे.

राज्यात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पुन्हा युती होण्याची प्रतिक्षा आहे. यातील अनेक नेते वारंवार तसे संकेतही देत असतात. मात्र, या केवळ चर्चा असल्याचे स्पष्टीकरण महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात येते. आता मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळे यावर चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या