श्रीलंकेवर दमदार विजय मिळवल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड खुश ; असं केलं सेलिब्रेशन

dhwan

श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

या विजयानंतर भारतीय संघ भलताच खूश आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडला देखील आनंद झालाय. हाच आनंद साजरा करण्यासाठी राहुल द्रविड भारतीय संघातील काही खेळाडूंसमवेत डिनरला पोहोचला. शेअर केलेल्या फोटोमध्ये काही खेळाडू राहुल द्रविड आणि शिखर धवन हॉटेलमध्ये डिनरला गेले असल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP