fbpx

सोलापुरात लवकरच सहकार विद्यापीठ सुरू करणार : सहकारमंत्री सुभाष देशमुख

उस्मानाबाद – विविध सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्यांना पाठबळ देत बिजनेस करस्पाँडट म्हणून बँकेने सहकार्य करावे असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

उस्मानाबाद येथे शनिवारी महाराष्ट्र स्टेट को.ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई, उस्मानाबाद शाखेचा शुभारंभ सम्पन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे, आपल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करत कर्ज व्यवस्थित भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. अनेक बँका सभासदांना भागभांडवलावर लाभांश देत नाही, त्यांनी कार्यपध्दती सुधारावी अशा सूचना सुभाष देशमुख यांनी यावेळी दिल्या.

प्रोत्साहनपर अनुदान, पिक विमा व पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत अदा करावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.
भाजपा सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहे, तशा उपाययोजना देखील करत आहे. दुष्काळाच्या बाबतीत जिथे जिथे अडचणी आहेत तिथे त्यासंदर्भात जिल्हधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. असे त्यांनी सांगितले. शिखर बँकेस ज्यांनी ज्यांनी ठेवी दिल्या त्या संस्थांचे आभार मानले.

पुढे ते म्हणाले, विविध कार्यकारी सोसायट्यांनी गावच्या विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदर्श घालून देणारे काम करावे, सहकारात काम करताना प्रत्येकांनी त्यागाची व सहकाराची भूमिका घेतली पाहिजे. येत्या काळात सहकारात भरपूर सुधारणा करणार आहे. पिशवीतल्या व कागदावरच्या सहकारी संस्था बंद केल्या आहेत. आपल्या सर्वांच्या सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करू यात शंका नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी सुजितसिंह ठाकूर (आमदार विधान परिषद), विद्याधर अनास्कर (प्रशासक राज्य शिखर बँक), राणा जगजितसिंह पाटील (आमदार), अविनाश महागावकर (संचालक राज्य शिखर बँक), सुरेश बिराजदार (अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक), नेताजी पाटील (जि. परिषद अध्यक्ष उस्मानाबाद), दत्ताभाऊ कुलकर्णी (भाजपा जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद), शहाजी भाऊ पवार (भाजपा जिल्हाध्यक्ष सोलापूर) आदी उपस्थित होते.