fbpx

दीड रुपयाने महागला सीएनजी

पुणे : काल गुरुवार (दि. ४) पासून सीएनजी आणि पीएनजी गॅस दीड रुपयाने महागला आहे. त्यानुसार आता ग्राहकांना सीएनजी ५६ रुपये ५० पैसे आणि पीएनजी ३० रुपये ५० पैसे या किमतीत मिळत आहे.

सीएनजी वाहनांतील वापरासाठी तर पीएनजी घरगुती वापरासाठी वापरण्यात येतो. गेल्या काही वर्षांत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच घरगुती वापरासाठीही पीएनजीचा वापर वाढला आहे. त्यामुळे कंपनीकडे त्याची मागणी वाढत आहे. शहरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या माध्यमातून सीएनजी व पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो.

रिक्षा, कॅब, खासगी वाहनांचा समावेश आहे. तसेच लाखो ग्राहकांना पीएनजीचा पुरवठा केला जातो तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) जवळपास निम्म्या बस सीएनजीवर धावतात. नागरिकांना मात्र या महगाईला तोंड द्यावे लागणार हे नक्की .