ताजमहाल भारतीय संस्कृतीचे प्रतिक नाही- योगी

yogi adityanath on namaj
ताजमहाल हा भारतीय संस्कृतीचे प्रतिक नाही, असे खळबळजनक वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. ते शुक्रवारी मोदी सरकारच्या त्रिवर्षीपूर्तीनिमित्त बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
नक्की काय म्हणाले आहेत योगी आदित्यनाथ
‘ भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना गीता आणि रामायणाची प्रत द्यावी. भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांना अनेकदा ताजमहाल किंवा मिनारींची प्रतिकृती भेट म्हणून दिली जाते. मात्र, ताजमहाल किंवा मिनारी या भारतीय संस्कृतीचे प्रतिक नाहीत, ‘असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. ‘दि टेलिग्राफ’ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.
 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा
 ‘ मुस्लिम स्त्रियांसाठी जाच ठरलेल्या तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर तुम्ही मौन बाळगून आहात. तिहेरी तलाकवर काही समाजवादी नेत्यांचे मौन हे शब्द आणि कृतीतील फरक दाखवतात. तुमच्यासारखे सेक्युलर म्हणवून घेणारे नेते या प्रश्नावर शांत का आहेत? तुम्ही या महिलांचा प्रतिष्ठेचे जीवन जगण्याचा हक्क का नाकारत आहात?’, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला.