fbpx

मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार, शिवसेनेची पोस्टरबाजी

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेनी पोस्टरबाजी करत मुख्यमंत्री आमचाच होणार असा दावा केला आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर मुख्यमंत्री सेनेचाच होणार असे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर या पोस्टरमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावले असून त्यावर ‘मुख्यमंत्री शिवसेना-भाजपा युतीचाच होणार, याचा अर्थ शिवसेनेचाच होणार‘ असे लिहिले आहे. या पोस्टरखाली नाशिकच्या नगरसेविका किरण गामणे (दराडे) यांचाही फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील मुख्यमंत्री पदावरील वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वीही वारंवार सेना आणि भाजपकडून मुख्यमंत्री आमचाच होणार अस स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणाच्या जागा जास्त निवडून येतात आणि कोण मुख्यमंत्री होणार हे निवडणुकीचा निकालावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.